पुलवामा हल्‍ल्‍यानंतरच्‍या विधानानंतर नवज्योत सिंग सिद्धूची कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी.

नवी दिल्‍ली ,(सह्याद्री buleteen)-पुलवामामध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्‍ल्‍यात ४० जवान शहीद झाले आहेत. राजकारणापासून देशाच्‍या कानाकोपर्‍यापर्यंत दु:खाची लाट आहे. नेते आणि माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर देशवासीयांकडून संताप व्‍यक्‍त होत आहे. सोशल मीडियावर लोक कपिल शर्माचा शो बंद करण्‍याची मागणी करत आहेत. इतकेच नाही तर युजर्सनी ट्विटरवर बायकॉट कपिल शर्मा आणि #boycottsidhuचा ट्रेंडदेखील सुरू केला आहे. त्‍याचबरोबर, पुलवामा हल्‍ल्‍यानंतरच्‍या विधानानंतर सिध्‍दू यांना कपिलच्‍या शोमधून हटवण्‍यात आल्‍याचे वृत्त आहे. त्‍यांच्‍या जागी अर्चना पुरणसिंगची एन्‍ट्री होणार असल्‍याचे वृत्त आहे.

पुलवामा हल्‍ल्‍यावर नवजोत सिंह सिद्धू यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर नेटिझन्सकडून कपिल शर्माचा शो बंद करण्‍याची मागणी होत आहे. त्याचबरोबर, शोमध्‍ये सिद्धू यांना हटवल्‍यानंतरच आम्‍ही कपिलचा शो पाहू, असे नेटिझन्सनी म्‍हणत आहेत.

आता चॅनलने सिद्धू यांना कपिल शर्माच्‍या शोमधून राजीनामा देण्‍यास सांगितले आहे. त्‍यांच्‍या जागी अर्चना पूरण सिंह शोमध्‍ये दिसणार आहे.

काय म्‍हणाले होते सिद्धू?

पुलवामामध्‍ये सीआरपीएफ जवानांवर दशहतवादी हल्‍ल्‍यानंतर ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्‍ल्‍याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए- मोहम्मदने घेतली आहे. या हल्‍ल्‍याबाबत सिद्धू म्‍हणाले होते, काही लोकांसाठी संपूर्ण देशाला जबाबदार कसे ठरवले जाऊ शकते? आपण कुणा व्‍यक्‍तीला जबाबदार ठरवू शकतो का? हा भ्‍याड हल्‍ला होता. मी याचा निषेध करतो. ही घटना निंदनीय आहे. आणि ज्‍यांनी हे केले आहे, त्‍यांना शिक्षा मिळायलाच हवी.

पंजाब विधानसभाचे कामकाज स्थगित करण्‍यात आल्‍यानंतर सिद्धू यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना हे वक्‍तव्‍य केले होते.

Review