इंडो सायकलिस्ट क्लब ( आयसीसी )तर्फे पुलवामा शाहिद जवानांस सी आर पी फ तलेगांव येथे श्रद्धांजलि अर्पण

तळेगाव,(सह्याद्री बुलेटीन)-शहरातील नामांकित क्रीडा , आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणारी अग्रेसर संस्था " इंडो सायकलिस्ट क्लब " चा वतीने तलेगांव येथील सी आर पी फ ग्रुप सेंटर येथे 14 फेब्रुवरी रोजी पुलवामा , जम्मू येथे झालेल्या अतिरेकी हल्या मद्दे शहीद झालेल्या सी आर पी फ चा वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली .

सकाळी सर्वजन रावेत येथून सुमारे पन्नास सायकलिस्ट तळेगाव येथे निघाले. देहुरोड ,वडगाव ,लोणावळा ,पुणे ,हडपसर नांदेड सिटी ,कोथरूड ,खराडी या सर्व ठिकाणाहून तळेगाव सीआरपीएफ ग्रुप सेंटर या ठिकाणी नव्वदहून अधिक सायकलिस्ट जमा झाले पुढे ठरल्याप्रमाणे असिस्टंट कमांडंट विनोद पंत यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वजन साधारणत सात वाजता शहीद स्मारक सीआरपीएफ ग्रुप सेंटर येथे जमा झाले.सुरुवातीला सीआरपीएफ तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर इंडो सायकलिस्ट क्लब च्यावतीने संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे व गणेश भुजबळ यांच्या मार्फत पुष्पचक्र अर्पण करण्यात आले , त्यानंतर सर्वांनी स्मारकाचे दर्शन घेत पाच मिनिटे शांतता पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

असिस्टंट कमांडंट विनोद त्यांनी पुलवामा येथे घडलेल्या प्रकारा बद्दल दुःख व्यक्त करत सीआरपीएफची कार्य कोणकोणत्या ठिकाणी व कसे चालते याबाबत थोडक्यात माहिती दिली. आयसीसीचे सल्लागार धनंजय शेडबाळे यांनी आपण नेहमी देशाच्या सैनिकांच्या मागे आहोत देशाची काळजी घेणाऱ्या सैनिकांची काळजी घेणे ही देशातील नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे असे सांगितले , इंडो सायकलिस्ट क्लबचे मेंबर्स आज सर्व भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या नजरेस असे काही कृत्य आल्यास त्यांनी लगेचजवळच्या आर्मी सेंटर किंवा पोलिसांना इन्फॉर्म करावे तसेच कापल्या सोसायटीमध्ये देखील तर अशा विघातक कृत्यांपासून सतर्क कसे राहता येईल याबाबत कलब वरिष्ठ सदस्य शंकरजी उणेचा यांनी मार्गदर्शन केले. नियोजनकर्ते आयसीसीचे श्रीकांत वतस , सुशील मोरे , गिरीराज उंबरिकर, राहुल नलावडे , सतिश पावसे संजय ढवळे , शंकर गाढवे ,राजेश शेटे ,संदीप परदेशी, मयूर कंकराज, स्वप्नील तायडे आदी मेम्बर्सने सहकार्य केले .

Review