समता टू-व्हिलर रँली काढून वाहिली शहिदांना आदरांजली

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) दि. - १९ फेब्रुवारी, वार - मंगळवार रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे प्रथमत: पुलवामा येथे शहिद झालेल्या शूरविरांना मानवंदना देवुन आदरांजली वाहन्यात आली तसेच समता टू-व्हीलर रॅलीचे आयोजन करन्यात आले होते. रॅलीची सुर्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथून -डिलक्स चौक-काळेवाडी-राहाटनी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पिंपरी गाव येथे रॅलीची सांगता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्हार अर्पन करून जय भिम सलामीची मानवंदना देवुन करन्यात आली.

त्यानंतर पिंपरीगाव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन येथे. खुले समता ग्रंथालयाचे उद्घाटन करन्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या लेखीका - आयु. तम्मना इनामदार. यांनी अतिशय मोजक्या आणि मार्मिक शब्दात युवकांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हनुण समता सैनिक दलाचे जेष्ठ सैनिक - आयु- सोपान लक्ष्मण कदम यांनी युवकांना आव्हान केले की महारुषांच्या जयंतीला गर्दी नाही झाली तरी चालेल पन महापुरूषांचे विचार तळागाळात पोहचले पाहीजेत. त्याचप्रमाने प्रमुख उपस्थिती -पिंपळे गुरव स.सै.द. शाखेचे - आयु. आशिष भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केलं तसेच आनंद नगर स.सै.द. शाखेचे- आयु. साकेत धावारे देखील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन -आयु. प्रा नरेंद्र पवार यांनी केले व स.सै.दलाचे प्रचारक - आयु. आशितोष कांबळे यांनी * खुले समता ग्रंथालयाची संकल्पना मांडली.* आश्या उत्साहपुर्ण आनंदीमय वातावरणात छत्रपती शिवाजीमहाराजांनी केलेल्या कार्यांच्या घोषना देत समता सैनिक दल पिं.चि. व पुणे. युनिट चे सैनिक व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल्लोषात जयंती साजरी करन्यात आली.

Review