निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनंच आदित्य ठाकरें;मराठवाड्यात दुष्काळी दौर्यावर – महेश आल्हाट यांचा आरोप

तळेगाव,(सह्याद्री बुलेटीन)-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका सरचिटणीस महेश आल्हाट यांचे शिवसेनेला प्रत्युत्तर लग्न सभारंभ हि व्यक्तीगत बाब आहे. रोहित पवार एका सिनेअभिनेता रजनीकांत यांच्या मुलींच्या लग्नाला गेल्यावरती त्यांच्यावर टीका होत आहे. परंतु आदित्य ठाकरे बॉलीवूडच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित असतात. मुंबईच्या चकचकीत जीवनाबाहेर निघून त्यांनी किती वेळा शेतकऱ्याचा दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला?यावेळी आदित्य ठाकरे यांना शेतकऱ्यांचे दुःख समजत नाही का?

आदित्य ठाकरे आता पशुखाद्य, गाई,शेळी वाटप करत आहे.तुमचे महाराष्ट्रात सरकार आहे, असे असतानाही दुष्काळग्रस्त भागासाठी असलेल्या योजना पोहचवण्याची जबाबदारी तुमची असतानाही हि नौटंकी कशाला? ठाकरे घराण्यामध्ये कुणी शेती केली नाही, यामुळे आदित्य ठाकरे यांना कापूस सुखला आहे आणि मक्याचे लोणचे वाटणाऱ्याला शेतकऱ्यांचे दुःख काय समजणार आहे. जेंव्हा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 47 बालके दगावली तेव्हा शिवसेनेचे ना आरोग्यमंत्री पोहचले, ना तुमचे मुख्यमंत्री पोहचले. तेव्हा सर्वात आधी रोहित पवार पोहोचले आणि तिथे अत्याधुनिक असे बेबी वॉर्मर किट पोहचले.

रोहित पवार यांनी तरुणांसाठी सृजन उद्योजकता आणि कौशल्य या अभिनया पासून 200 हून अधिक व्यवसाय यशस्वीरित्या उभे करून उद्योजक घडविले आहे.सासवड येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीरा मार्फत 31,500 रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यामध्ये काही रुग्णाची ऑपेरेशन करण्यात आली. आदित्य ठाकरे यांचा दुष्काळ दौरा लाभदायी ठरेल का हे येत्या निवडणूकी मध्ये स्पष्ट होईल.

Review