लबाड, लाचार शिवसेनेत राहु शकत नाही - युतीमुळे मारूती भापकरांचा जय महाराष्ट्र
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- सेनेची विरोधाची ही नौटंकी होती हेच यातुन सिद्ध झाले आहे. स्वाभिमान गुडाळुन लाचारीची ही सेनेची भूमिका मला अजिबात मान्य नाही.समाजमाध्यातुन यावर खूप टिका होत आहे. ती मला सहन होत नाही. अशा स्वाभिमान शून्य, लबाड, लाचार पक्षात मी राहु शकत नाही, असे म्हणत शहारतील माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सेनेला जय महाराष्ट्र ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेने चार वर्षे भाजपाविरोधात भुमिका घेतली. स्वाभिमानाच्या गोष्टी केल्या. पहिले मंदिर फिर सरकार हि अयोध्येत घोषणा केली. पंढरपूरा चौकीदार चोर हैअशी सिंह गजंना केली. शेतकरी, कामगार, सर्व सामान्य माणसाला स्वप्न दाखवून मते घेतली. नोटबंदी, जी.एस.टी.लागु करून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले. अशा झुमलेबाज भाजपा बरोबर निरलज्ज पणे सेनेने युती केली. सेनेची विरोधाची ही नौटंकी होती हेच यातुन सिद्ध झाले आहे. स्वाभिमान गुडाळुन लाचारीची ही सेनेची भूमिका मला अजिबात मान्य नाही.समाजमाध्यातुन यावर खूप टिका होत आहे.ती मला सहन होत नाही. अशा स्वाभिमान शून्य, लबाड, लाचार पक्षात मी राहु शकत नाही. त्यामुळे मी शिवसेना या पक्षाचा आज चार वाजता राजीनामा देत आहे, असे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी जाहीर केले आहे.