रेल्वेत होतेय मेगाभरती; एक लाखांहून अधिक जागा भरण्याच्या तयारीत

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)- भारतीय रेल्वेमध्ये सध्या जवळ 1.5 लाख जागा रिक्त आहेत. त्यापैकी रेल्वे भरती खाते हे लवकरच 1.3 लाख जागा भरण्याच्या तयारीत आहे. रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) नॉन टेक्निकल विभागातील या जागा भरणार असून यासंबधित लवकरच जहिरात देण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

पुढच्या आठवड्यात याबाबत अधिकृत जहिरात निघण्याची शक्यता आहे. 1.3 लाख पदापैकी जवळपास 1 लाख रिक्त पदे प्रथम श्रेणीसाठी आहेत तर तर बाकी सहाय्यक स्टेशन मास्टर, रक्षक, पॅरामेडिक्स, नर्स आणि कारकून या पदासाठी जागा असल्याचे सांगण्यात आले आहे.

रेल्वे भरती बोर्डाकडून परिक्षासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारीपासून अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला सुरवात होऊ शकते. 18 ते 32 वयोगटातील व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, यापूर्वीच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेत 4 लाख लोकांची भरती करणार असल्याचे सांगितले होते.

Review