
मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा;एका क्लिकवर देशातील 12 कोटी-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये होणार जमा
लखनऊ,(सह्याद्री बुलेटीन) -पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूर राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्ताने येथे उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी एका क्लिकवर देशातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये जमा करणार आहेत. या वर्षातील सर्वात मोठी घोषणा ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना मोदी सरकारकडून लागू केली जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. राष्ट्रीय किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता येत्या रविवारी दिला जाणार आहे. तसेच या योजनेवर केंद्र सरकारकडून 75 हजार कोटी रुपयांचा खर्च केले जाणार आहे.
दरम्यान, किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक अशी ठरणार असल्याचे सांगितले. ही रक्कम छोट्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
दरम्यान, किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक अशी ठरणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांसाठी ही पहिली योजना
उत्तर प्रदेशातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. मोदी सरकारने तेलंगणा सरकारच्या रेत बंधू योजनेपासून प्रेरणा घेत ही योजना राबवल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांसाठी लागू केली जाणारी ही पहिलीच योजना आहे, असे उत्तर प्रदेशातील भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राजा वर्मा म्हणाले.