माजी महापैार मंगला कदम यांच्यावर मानदानीचा दावा ठोकणार

 

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)दि.26 - महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानात लवकरच जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला अदयावत लेझर शो करण्यात येणार आहे. या लेझर शो च्या जून्या आणि नव्या निविदेत जमीन आस्मानचा फरक आहे. मात्र, जूनी निविदा रद्द केल्याने माजी महापैार मंगला कदम यांचा पोटशूळ झाला आहे. त्यांना सध्या काहीच काम नसल्याने उठसूठ भाजप नगरसेवकांवर आरोप करीत आहेत. त्यांनी विनाकारण आमची बदनामी सुरु केल्याने त्यांच्यावर न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार आहे, अशी माहिती नगरसेवक तुषार हिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक केशव घोळवे आदी मान्यवर उपस्थित होते.  पिंपरी-चिंचवड महापालिकेने संभाजीनगर बर्ड व्हॅली उद्यानात सन 2015-16 या कालावधीत लेझर शो च्या कामाची निविदा काढली होती. या निविदेचा खर्च 9.35 कोटी इतका होता. तर हा प्रकल्प केवळ 456 मीटर एवढ्या परिसरात होता. परंतू, नव्या निविदेचा खर्च 10.69 कोटी असून हा प्रकल्प 1300 मीटर एवढ्या परिसरात करण्यात येणार आहे. त्यामुळे लेझर शो चा परिसर दुपटीने वाढला आहे.  या निविदा प्रकल्पात अदयावत जर्मन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हा प्रकल्प अधिक दर्जेदार होणार आहे.  

या निविदा प्रकल्पात कोणाचाही हस्तक्षेप झालेला नाही. परंतू, विरोधकांच्या मर्जीतील लोकांना आर्थिक मलिदा लाट आलेला नाही. त्यांना कसलीही ढवळाढवळ करता येत नसल्याने संबंधित माजी महापैारांचा तिळपापड होवू लागला आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या बदनामीचा विढाच उचलेला आहे. 

हा लेझर शो आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार असून त्याचे काम नामांकीत आंतरराष्ट्रीय कंपन्यांना या निविदामध्ये सहभागी होता येणार आहे. या निविदेची किमंत सध्याच्या बाजारभावानुसार करण्यात आलेली आहे. शिवाय अदयावत तंत्रज्ञानामुळे काही बदल केलेले आहेत.   तसेच पूर्वीच्या निविदेपेक्षा अधिक दर्जेदार जर्मन बनावटीचे अँटोमेटीक पंप, नोझल व इतर सर्व साहित्य वापरणार येणार आहे. 

त्यामुळे माजी महापैार मंगला कदम यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. आम्ही प्रभागात नवनवीन विकास कामे करु लागल्याने त्याचा तिळपापड होवू लागला आहे. त्यांना शाहूनगर, संभाजीनगर प्रभागातील विकास कामांना विरोध करुन सर्व कामे हाणून पाडायची आहेत. आम्ही कधीही विकास कामाना विरोध करीत नाही. तसेच विकास कामांमध्ये राजकारणही करीत नाहीत. त्यामुळे माजी महापैारांनी प्रभागातील विकास कामांना विरोध दर्शविणे चुकीचे आहे. तसेच त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपामुळे विनाकारण आमची बदनामी होवू लागली आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात न्यायालयात लवकरच मानीहानीचा दावा दाखल करणार आहे, असेही हिंगे यांनी सांगितले. 

दरम्यान, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोरवाडी परिसरात कित्येक वर्षापासून स्मशान भूमीचा देखील प्रश्न रेंगाळत पडलेला होता.  तो प्रश्न देखील सुटण्याच्या मार्गावर असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्मशानभूमीचा देखील प्रश्न सुटणार आहे.

Review