कर्ण बधिरांवरील लाठीचार्ज हा पुणेकरांची मान लाजेने खाली घालणारा!:आप ची निषेध निदर्शने.
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)-काल पुण्यातील कर्णबधिरांवर लाठीचार्ज करण्यात आला.समाजातील या दुर्बल घटकास आवाज नाही , त्यांचा आवाज किमान शासनाने ऐकावा , त्यांच्या न्यायपूर्ण हक्काच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशी अपेक्षा असताना त्यांच्याशी कुठलाही संवाद न साधता पोलिसांमार्फत त्यांच्या वर लाठीहल्ला करून दडपणूक करणाऱ्या गृहखात्याच्या निषेध आणि या लाठीमारास जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी करत आम आदमी पार्टीने पुणे येथे अलका चौकात निदर्शने केली.
या वेळेस सरकारच मूक बधिर झाले असून दुर्बल घटकांना दडपण्याचे धोरण भाजप सरकार वापरत असल्याचा आरोप आप ने केला.
आप चे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत, सैद अली , सुभाष कारंडे , डॉ वायकुळे , रोशन गावंडे, गजानन भोसले ,राजेंद्र वराडे , पैगंबर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.