जम्मू-काश्मीरमध्ये बसवर ग्रेनेड हल्ला-28 नागरिक जखमी
श्रीनगर,(सह्याद्री बुलेटीन)- जम्मू- पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील वातावरण तणापूर्ण असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
जम्मू कश्मीरमध्ये अद्यापही वातावरण तणावपूर्ण असतानाच जम्मू बस स्थानकातील बसवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या स्फोटात 18 जण जखमी झाल्याचे स्थानिक पोलीसांनी सांगितले होते. मात्र आता जखमींचा आकडा वाढला असून 28 वर पोहोचला आहे. तसेच दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून परिसर रिकामा करण्यात आला आहे. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.