लोकसभेचा काळ तर आलाय फक्त वेळेची प्रतीक्षा...

नवी दिल्ली ( सह्याद्री बुलेटिन ) - लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आता कोणत्याही क्षणी करू शकतो. काळ आला आहे फक्त वेळ येण्याच्या वेळेची प्रतीक्षा आहे.
संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. आयोगाच्या सूत्रांनुसार सर्व तयारी पार पडल्यानंतर 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीची घोषणा केली जाणार आहे. विद्यमान 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपत असल्याने त्या अगोदरची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल आणि मे महिन्यात मतदानाचे टप्पे पार पाडले जातील. लोकसभा निवडणुकासोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार आहेत.

२००४ मध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. तेव्हा 29 फेब्रुवारी रोजी निवडणुकीची घोषणा केली होती.
२००९ मध्ये २ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा करून पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी १६ एप्रिल २००९ रोजी मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला होता तर शेवट १३ मे रोजी अखेरचा मतदानाचा टप्पा पार पडला होता.
२०१४ लोकसभा निवडणुकींची घोषणा ५ मार्च रोजी करण्यात आली होती त्यावेळी ९ टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आगामी दोन-तीन दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकते.

Review