लाच देऊन मते विकत घेणे ही भाजपची दानव संस्कृती- सचिन सावंत

मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला पैसे देतो, असं विधान करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी एकप्रकारे मतदारांना आर्थिक प्रलोभनच दाखवलं आहे, असं सावंत म्हणाले लाच देऊन मते विकत घेणे ही भाजपची 'दानव' संस्कृती आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी रावसाहेब दानवेंवर आणि पर्यायाने भाजपवर शरसंधान साधलं आहे.


भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे कोणतेही ठोस काम नाही त्यामुळे देश आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकवण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे, असंही सावंत यावेळी म्हणाले.

दरम्यान, जालन्याच्या एका सभेत बोलताना मी तुम्हाला पैसे दिल्यावर तुम्ही मला मतदान करणार की नाही?, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.

Review