एका नातवासाठी पवारांची माघार, तर दुसरा नातू म्हणतो साहेब,आपण निर्णयाचा पुनर्विचार करा, निवडणूक लढा : रोहित पवार
(सह्याद्री बुलेटीन)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात सुरु असलेल्या विविध घडामोडींमध्ये माहिती देतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रिंगणातून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. यानंतर एकीकडे सोशल मीडियामध्ये अशी चर्चा सुरू झाली कि, “पराभूत होण्याच्या भीतीने पवार माढ्यातून निवडणूक लढविणार नाहीत’, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अशी प्रतिक्रिया दिली की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे हा युतीसाठी मोठा विजय आहे. तसेच बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवारांना लवकर येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय शरद पवार यांनी पुनर्विचार करून घ्यावा अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे दरम्यान रोहित पवार यांनी आजोबांना निवडणूक लढवण्याची गळ घातली आहे. ‘साहेब, आपण निर्णयाचा पुनर्विचार करा, निवडणूक लढा’, असा हट्टच त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.