
आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम; बहुजन वंचित आघाडी सर्व 48 जागा लढवणार
अकोला(सह्याद्री बुलेटीन)-बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर कुठल्याही प्रकारची आघाडी करणार नसल्याची घोषणा केली आहे. तसेच बहुजन वंचित आघाडी राज्यातील सर्व 48 जागा लढवणार असून उमेदवारांच्या नावाची घोषणा येत्या १५ मार्चला करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
काँग्रेसने दिलेले प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत, काँग्रेसबरोबर आता चर्चा होऊ शकत नाही. सर्व मार्ग बंद झाले आहेत असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर आहे. ते अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.