
पार्थ पवार ऐवजी श्रीरंग बारणे ? तर मावळ मधील उमेदवारी बदलली जाऊ शकते...
पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन - दत्ता सोनवणे देशमुख ) - राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून मावळ मतदार संघासाठी पार्थ पवार यांची घोषणा करण्यात आली होती. पण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस तळ्यात मळ्यात आहे कारण शिवसेनेचे मावळचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. जर भाजपच्या राजकीय दबावापोटी शिवसेनेने श्रीरंग बारणे यांची उमेदवारी नाकारली तर राष्ट्रवादी "बारणे" यांना उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर असे झाले तर पार्थ पवार यांच्या जागी बारणे यांची वर्णी लागू शकते.
राजकारणात काहीही होऊ शकते.
जो पर्यंत शिवसेना आपले पत्ते ओपन करत नाही तोपर्यंत बारामती राजकीय चाल खेळणार नाही.
कारण शरद पवार ठामपणे पार्थवर शिक्कामोर्तब करत नाहीत, या बाबत विचारले असता
"मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे, तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तसेच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचा, असा सल्ला पवार कार्यकर्त्यांना देत आहेत.
आता घोडा मैदान जवळ आहे. लवकरच कळेल, राष्ट्रवादीच्या रथाचे सारथ्य पार्थ करेल, श्रीरंगाला आमंत्रण मिळेल किंवा अन्य कोणी असेल...