शिक्षक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत गादगे यांना "इंटरनँशनल द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज अवार्ड" जाहीर...
( सिद्धार्थ सूर्यवंशी )
जळकोट (सह्याद्री बुलेटिन ) - महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष गणपत निवृत्तीराव गादगे यांना "छत्रपती शिवराय नवरंग आर्ट लिटरेचर काँनफरन्स,कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा "इंटरनँशनल द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज अवार्ड - २०१९" पुरस्कार घोषित झाला आहे.
थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ व इतर मान्यवरांच्या हस्ते दि.२३ मार्च २०१९ रोजी छत्रपती शाहु स्मारक हाँल,कोल्हापूर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे कालीदास माने सर ( राज्यध्यक्ष ), वसंत घोगरे सर (राज्य सरचिटणीस ), ब्रिजलाल कदम सर, जे.जे.गायकवाड सर, संजय अलमले सर (राज्य उपाध्यक्ष ), राजाभाऊ सोमवंशी सर, दिपक चामे सर, शंकर कदम सर (विभागीय पदाधिकारी ) तसेच जिल्हाचे केशव भैय्या गंभीरे सर ( जिल्हाध्यक्ष ), सुरेश सुडे सर (जिल्हा - सरचिटणीस ), संजय बिरादार सर, विनायक सावंत सर, विकास माने सर,प्रताप सोमवंशी सर, सत्यवान शिंदे सर,उत्तम शेळके सर (जिल्हा पदाधिकारी ) व सर्व तालुका पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.