मोदीं सरकार खोट्या प्रचारापासून जनतेने सावध रहावे -मायावती
लखनऊ,(सह्याद्री बुलेटीन) – समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल पक्ष यांच्यासोबत युती केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चांगलेच टिकास्त्र सुरू केले आहे. ट्विटर अकाउंटवर सक्रिय झाल्यानंतर असा एकही दिवस नाही, त्यादिवशी मायावती यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणे टाळले आहे.
मायावती यांनी आज ट्विट करत जनतेला मोदींच्या खोट्या प्रचारापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मायावती यांनी म्हटलं आहे की, “भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेपासून आपल्या सरकारचे अपयश लपविण्यासाठी तसेच गरीबी आणि बेरोजगारी इत्यादी मुद्यांवरून होणारी टीका टाळण्यासाठी मेलेले मुर्दे उकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेने असल्या प्रचारापासून सावध रहावे”.