प्रियांका गांधींमुळे भाजपच्या कामगिरीवर कुठलाच परिणाम होणार नाही :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ,(सह्याद्री बुलेटीन) – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवर कुठलाच परिणाम होणार नाही. सप आणि बसप या पक्षांमधील आघाडी म्हणजे केवळ हवा आहे, असा दावा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर योगींनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाम (नाव) आणि काम (कार्य) या जोरावर उत्तरप्रदेशसह देशभरात भाजपची कामगिरी चांगली होण्याबाबत विश्‍वास व्यक्त केला. लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीत मोदींचे केवळ नाव होते. आता 2019 च्या निवडणुकीत नाम आणि काम या दोन्ही बाबी आहेत, असे त्यांनी म्हटले. प्रियांका यांचा राजकारण प्रवेश आणि सप-बसप आघाडीमुळे उत्तरप्रदेशात भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्या घडामोडींना फारसे महत्व देण्याचे योगींनी टाळले.

प्रियांका यांना कॉंग्रेसने सरचिटणीस बनवणे हा त्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. त्यांनी आधीही कॉंग्रेसचा प्रचार केला. आताही त्या त्यांच्या पक्षाच्या प्रचारक आहेत. मात्र, त्याचा भाजपवर काही परिणाम होणार नाही, अशी भूमिका योगींनी मांडली.

 

Review