होळीच्या दिवशी शिवसेनेची दिवाळी, मावळ लोकसभेची उमेदवारी श्रीरंग बारणे यांना निश्चित...

याच विषयावर शिवसेना नेते अनंत कोऱ्हाळे यांच्याशी केलेली बातचीत जरूर पहा.

( सह्याद्री बुलेटिन ) - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांना होळीच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या वतीने उमेदवारी निश्चित झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक दिवसांपासून वावड्या उठत होत्या. भारतीय जनता पार्टीने मावळ हा आपल्याकडे असावा, यासाठी आग्रह धरला होता, यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्ते हे प्रयत्नशील होते.

मावळमधून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे उतरविल्या मुळे एक तगडा उमेदवार असावा यासाठी भाजपचा आग्रह होता, पण बारणे यांच्या नावाला मात्र त्यांचा विरोध होता. आणि यामधून मार्ग काढण्यासाठी अनेक चर्चासत्र झडली जात होती. अखेर शेवटी होळीच्या दिवशी बारणे यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे शिवसैनिकांची दिवाळी सुरू आहे.

एकवीरा देवीचे दर्शन घेऊन खासदार बारणे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करतील.

Review