देहूरोड: ऐतिहासिक बुद्धविहार आणि गुरुद्वारामध्ये माथा टेकून बारणे यांचा देहूरोड परिसरात प्रचाराचा धडाका...

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे बुद्धमूर्ती स्थापन केलेल्या ऐतिहासिक बुद्धविहारास तसेच श्री गुरु सिंग सभा गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर बाजारपेठ, महात्मा फुले भाजी मंडई, पारशी चाळ रोड, पुणे-मुंबई महामार्ग, चिंचोली, किन्हईगाव या भागात प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी फटाके वाजवून, पुष्पहार घालून, पुष्पगुच्छ देऊन तसेच सुवासिनींनी औक्षण करून बारणे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

बारणे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सरिता बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, देहूरोड शहरप्रमुख महेश धुमाळ, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, भाजपचे देहूरोड शहराध्यक्ष कैलास पानसरे, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक सचिन भोसले, भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रमेश जाधव, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पिंजण, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, कॅन्टोन्मेट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुनंदा आवळे, राहुल बालघरे, नवभारतीय शिव वाहतूक सेना उपाध्यक्ष सागर लांघे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अमोल नाईकनवरे, नगरसेवक विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, अरुणाताई पिंजण, सारिकाताई नाईकनवरे, हाजी अराफत युवा मंचचे अध्यक्ष अशरफ अत्तार, लहुमामा शेलार, बाळासाहेब शेलार, बाळासाहेब जाधव, तुकाराम जाधव, गोविंदराव जाधव, संकेत तरस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
देहूरोडच्या ऐतिहासिक बुद्धविहारात धर्मपाल तंतरपाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन बारणे यांना शुभेच्छा दिल्या. श्री गुरु सिंग सभा गुरुद्वारामध्ये विश्वस्त गुरुमित सिंग रत्तू यांनी बारणे यांचे स्वागत केले. देहूरोड बाजारपेठेत ढोल, ताशाच्या दणदणाटात प्रचारफेरी काढण्यात आली. ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. बारणे यांनी दुकानांमध्ये जाऊन व्यापारी बांधवांशी संवाद साधला. व्यापारी बांधवांनी अभिवादन तसेच हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. गणेश मंदिर तसेच लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन घेतले. महात्मा फुले भाजी मंडईत फेरफटका मारून भाजी विक्रेत्यांची भेट घेतली. मंडईत फरशी बसवून देण्याचे काम केल्याबद्दल भाजी विक्रेत्यांनी बारणे यांना धन्यवाद दिले.

देहूरोड बाजारपेठेनंतर बारणे यांनी चिंचोली आणि किन्हईगावात प्रचारफेरी काढून ग्रामस्थांशी संपर्क साधला. चिंचोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचारफेरीस प्रारंभ केला. ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. गावातील प्रमुख रस्त्यांवरून प्रचारफेरी काढत मतदारांशी संपर्क साधला. 'देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो', 'आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

किन्हईगावातील गल्ली-बोळातून प्रचारफेरी काढण्यात आली. घराघरातून बारणे यांचे जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी भगिनींनी औक्षण करून बारणे यांना सुयशासाठी शुभेच्छा दिल्या. प्रचारफेरीत शुभम पिंजण, मयूर पिंजण सचिन कनभूर, बबनदादा पिंजण, प्रभू नाटेकर, गोपी साळुंखे, जय पिंजण, किरण पिंजण, संजय पिंजण, नगरसेविका अरुणाताई पिंजण संदीप गोटे, हनुमंत पिंजण, नंदकुमार पिंजण आदी सहभागी झाले होते.

Review