शरद पवारांनासुद्धा हवेचा अंदाज ओळखून माघार घेतली; मोदींची पवारांवर टीका
वर्धा,(सह्याद्री बुलेटीन) शरद पवारांनासुद्धा हवेचा अंदाज आला,त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
हवेचा त्यांना अंदाज आला आणि त्यांनी निर्णय बदलून मी राज्यसभेतच ठीक आहे, असं म्हटलं. शरद पवारांची राष्ट्रवादी आता रसातळाला चालली आहे. त्यांनी 10 वर्ष केंद्र कृषीमंत्री म्हणून काम केलं पण त्यांना जे जमलं नाही ते मी 5 वर्षांत करून दाखवलं, असं मोदी म्हणाले.
अजित पवार पाण्यासंबंधी महाराष्ट्रातील जनतेला काय म्हणाले होते. हे महाराष्ट्रातील जनता विसरणार आहे काय? मी हे मंचावरून सांगू शकतो काय? असं म्हणत त्यांनी अजित पवारांवरही टीका केली.
दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महामिलावट जोडीला एकही जागा मिळता कामा नये, असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.