पार्थ पवारांचा प्रचारार्थ युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पिंपरीत

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-लोकसभा निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून यामध्ये विविध संघटना एकत्रित पणे प्रचारात उतरले आहेत. काल भारतीय युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शेकाप, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व अनेक युवक एकत्रित संघटना येऊन, एस एम जोशी सभागृह येथे बैठक घेतली. त्यानंतर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पार्थ पावार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष केशवचंद यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे,आदी प्रमुख पदाधिकारी दुचाकी रॅली साठी पिंपरी चिंचवड येथे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने काळेवाडी येथील पक्ष कार्यलयात केशवचंद जी यादव यांना शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. तसेच धीरज शर्मा सत्यजित तांबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस सेवादल राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयूर जैस्वाल, प्रदेश युवक काँग्रेस सचिव व शहर प्रभारी कल्याणीताई माणगावे, पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सजी वर्की, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे,चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, शहर सेवादल अध्यक्ष मकर यादव, सरचिटणीस मुनसब खान,चिंचवड युवक अध्यक्ष संदेश बोर्डे, ज़िल्हा युवक काँग्रेस चे चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे,वासिम शेख, तुषार पाटील,शैलेश अनंतराव, जिफिन जॉन्सन, रोहित शेळके आशिष नायडू,परमेश्वर पांचाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Review