पुणे – महापालिकेच्या शाळा ई-लर्निंग, पण, वेबसाइटच नाही?

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तब्बल २८७ शाळा असून लाखभर विद्यार्थी आहेत. तसेच दरवर्षी तब्बल ४०० कोटी रुपयांचा खर्च या विभागावर केला जातो. त्यामुळे साधे संकेतस्थळ अथवा या विभागाची माहितीही संकेस्थळावर नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेच्या शाळा ई-लर्निंग केल्या जात आहेत. तर, दुसऱ्या बाजूला या शाळांचा कारभार पाहणाऱ्या शिक्षण विभागाचे साधे संकेतस्थळही नाही. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही या विभागाची कोणतीही माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे असा कसा “डिजिटल’ कारभार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

 

Review