घरात घुसून ठोकून काढीन - सुप्रिया सुळे यांची धमकी, मीडियावर औडिओ क्लिप व्हायरल
पुणे (सह्याद्री बुलेटिन ) - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी मधून भाजपात गेलेले राहुल शेवाळे यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे म्हणतात की, या माझ्या नादाला लागू नका. मी काही कंत्राटदार नाही. घरात घुसून ठोकून काढेल. अशी भाषा राहुल शेवाळे यांना वापरल्याने सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील शेवाळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सुळेंविरोधात काही विधाने केल्याच्या बातम्या देखील प्रसारीत झाल्या. त्या बातम्यांची दखल घेत, खासदार सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांना फोन करून जाब विचारल्याचा दावा करणारी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
यात सुप्रिया सुळे म्हणतात कि, तुम्ही भाजपात गेला आहात ठीक आहे. पण माझ्या नादी लागू नका. मी खूप सिरियस आहे. मी काही काँट्रॅक्टर नाही. घरात घुसून ठोकून काढेल. माझ्या बदनामी विरोधात अब्रूनुकसानीचा दावा करेल एक लक्षात ठेवा. मी काही काँट्रॅक्टर नाही. कुणाच्या बापाचे पाच पैसे खाल्ले नाही एवढं लक्षात ठेवा.
या क्लिप मुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.