दगडाने ठेचून तरुणाचा खून, एच. ए. मैदानातील धक्कादायक प्रकार
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन) - दगडाने ठेचून तरूणाचा मृतदेह जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी( दि. 21 ) सकाळी आठच्या सुमारास पिंपरी नेहरूनगर येथील एच.ए. मैदानात आढळून आला.
गांधीनगर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाचे नाव अजय राजेश नागोसे असून तो एच.ए. कंपनीमध्ये कॅन्टीनमध्ये कामाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.
पिंपरी येथे मैदानात काही तरुण क्रिकेट खेळण्यासाठी आले होते, दरम्यान त्यातील एकाला मैदानाच्या अडगळीच्या ठिकाणी मृतदेह असल्याचे दिसले, त्यांनी मानवी हक्कं संरक्षण व जागृतीचे युवा जिल्हाध्यक्ष धनराज सिंग चौधरी यांच्याशी संपर्क साधला, चौधरी यांनी प्रसंगावधान राखत पोलिसांना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली, रुग्णवाहिका, फॉरेन्सिक लेब चे डॉक्टर व डॉग स्कॉड सर्वांशी संपर्क साधून मदतीला बोलावून घेतले.
पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता वीस ते बावीस वर्ष तरुण वयाचा तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला केला व त्याचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. पहाटेच्या सुमारास खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.