वाजत गाजत मोदींनी भरला वाराणसीतून अर्ज

( सह्याद्री बुलेटिन ) - लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीत शक्तिप्रदर्शन करत,राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला.
बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोदी यांनी सुमारे सात किलोमीटपर्यंतच्या ‘रोड शो’ची सुरुवात केली. गंगा आरतीनंतर त्यांनी एका सभेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले होते. शुक्रवारी सकाळी मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद
साधल्यानंतर मोदींनी उमेदवारी अर्ज भरला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एनडीएतील सर्व घटकपक्षांचे नेते या प्रसंगी उपस्थित होते.
यंदाच्या निवडणुकीत मोदींविरोधात काँग्रेसचे अजय राय रिंगणात उतरले आहेत.

Review