लोकशाहीचा प्राणवायू म्हणजे मतदान - नगरसेविका गीता मंचरकर
पिंपरी - आपले हक्क आणि अधिकार हि लोकशाहीची देणं आहे आणि या लोकशाहीचा प्राणवायू म्हणजे मतदान आहे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रतिपादन नगरसेविका गीता मंचरकर यांनी केले,
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सहकुटुंब मतदान केल्यानंतर त्या बोलत होत्या.
यावेळी ऍड. सुशील मंचरकर यांच्यासह त्यांचा परिवार आणि कार्यकर्ते उपस्तित होते,
भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे, या देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तसेच कर्तव्य पण आहे, याची जाणीव करून देणारा दिवस हा मतदानाचा दिवस आहे. यामुळे या पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करावे आणि लोकशाहीला बळकटी आणावी असे आवाहनही मंचरकर यांनी केले.