मगर क्रीडांगणावर खड्डेच खड्डे, नागरिकांची गैरसोय, उदासीन शासन, प्रशासनाला कधी येणार जाग ?


( प्रदीप मस्के )

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक विषयक कामासाठी निवडणूक आयोगाला देण्यात आले होते, निवडणूक आयोगाच्या वतीने या ठिकाणी मुख्य मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला होता या मंडप उभारणी साठी मुख्य कार्यक्रम सुरू होण्या आगोदर 4 दिवसांपासून म्हणजे 20 तारखे पासून 24 तारखे पर्यंत मंडप उभारणीचे काम सुरू होते ते कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे 29 तारखेपासून पुढे 4 मे पर्यंत हा मंडप काढण्याचे काम सुरू होते म्हणजे एकूण 15 दिवस अण्णासाहेब मगर स्टेडियम हे या कार्यक्रमासाठी मंडप व इतर साहित्याने व्यापलेले होते, या सगळ्या प्रकारा मुळे अण्णा साहेब मगर स्टेडियमचा वापर पिंपरी चिंचवड परिसरातील हजारो नागरिक जे जॉगिंग साठी व इतर काही कारणांसाठी नेहरूनगर,अजमेरा, खराळवाडी, संत तुकाराम नगर व पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक भागातून सकाळी व संध्याकाळी करतात त्या हजारो नागरिकांची, खेळाडूंची तसेच विध्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली, ऐन उन्हाळ्यात या कार्यक्रमाला मैदान दिल्यामुळे शाळेच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुट्टया लागलेले विध्यार्थी देखील या मैदानात खेळू शकले नाहीत,मुळात याच मैदानात हिरवळ करण्यासाठी मागच्या काही वर्षांमध्ये सर्व सामान्य जनतेचे लाखो रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खर्च केले.... तो खर्च पाण्यात घालून मैदानाची दुर्दशा करण्याच्या हेतूने व परिसरातील नागरिकांची व विध्यार्थांची गैरसोय करण्यासाठी हे मैदान पालिकेने निवडणूक आयोगाला दिले होते काय?असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकाला पडतो...... उत्कृष्ट प्रशासन व्यवस्थेचा पुरस्कार मिरवणारी पालिका एवढी बेजबाबदार कशी असू शकते? एरवी श्रीमंत पालिका व क्रीडा नगरी अशी ओळख असणारी पालिका मैदानाच्या संदर्भात एवढी बेजबाबदार कशी वागू शकते.... मुळात मुख्य मैदानात मंडप उभा करण्यासाठी क्रीडा विभागाने परवानगी तरी कशी दिली? या सगळ्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना जो त्रास झाला,मगर स्टेडियमचे जे नुकसान झाले आणि सर्व सामान्य जनतेचा जो पैसा या मैदानाच्या हिरवळी साठी वापरला तो वाया गेला. तरीही पालिकेच्या क्रीडा विभागाला आणि पालिका प्रशासनाला जाग येत नाही हे दुर्दैव...

Review