केदारनाथच्या साक्षीने मोदी झाले ध्यानमग्न...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले असून मोदी केदरानाथ जवळील एका गुहेमध्ये ध्यानालाही बसले. सकाळपर्यंत मोदींची ही ध्यान धारणा चालेल.
पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी ९.३०च्या सुमारास डेहराडूनच्या विमानतळावर उतरले आणि विशेष हेलिकॉप्टरने केदारनाथला आले.तेथे पूजा केल्यानंतर त्यांनी परिसरात सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेतला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात आले. तिथे त्यांनी विधीवत पूजा केली आणि विजयासाठी साकडं घातलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक गढवाली पोशाखही परिधान केला होता. नरेंद्र मोदी हे १९ तारखेला म्हणजेच उद्या बद्रीनाथाच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत.

Review