विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी चंद्राबाबू नायडू यांनी सुरु केल्या गाठी भेटी
विरोधी पक्षांनी सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी दिल्लीमध्ये काँग्रेस, सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षीय नेत्यांची भेट घेतली. नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबरोबर सरकार स्थापनेच्या दृष्टीने विरोधी पक्षांच्या एकजुटीबद्दल चर्चा केली. त्यांनी शनिवारी सीपीआयचे नेते जी. सुधाकर रेड्डी आणि डी. राजा यांची भेट घेतली.
नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि एलजेडीचे नेते शरद यादव यांची सुद्धा भेट घेतली. नायडू यांनी यापूर्वी तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, आपचे अरविंद केजरीवाल आणि सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या बरोबर सुद्धा चर्चा केली आहे.
पंतप्रधान मोदींना सत्तेपासून रोखण्यासाठी महाआघाडी भक्कम करण्याचा त्यांचा इरादा आहे.