प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले गुढग्याला बाशिंग बांधून तयार

पक्षश्रेष्ठींनी राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्वीकारण्याची माझी तयारी आहे. असे वक्तव्य कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पराभवानंतर राजीनामा दिला त्यामुळे या पदासाठी आपण इच्छुक असल्याचे संकेत नाना यांनी दिले, सध्या काँग्रेसमध्ये राजीनामा देण्याची चढाओढ लागली आहे याच पाश्वभूमीवर नवीन लोकांना संधी मिळण्याची संधी देखील वाढली आहे, याचा फायदा उचलत अनेक नेते पदावर दावा सांगण्यासाठी पुढे येत आहेत यात नाना पटोले अग्रणी आहेत.

Review