ठाकरे पवार भेट - राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटे राजकीय विषयावर चर्चा झाल्याचे समजते. मंगळवारी सायंकाळी राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.त्यानंतर राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. या भेटीचे छायाचित्र मनसेच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आले आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीगाठीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले आहे. मनसे आणि राष्ट्रवादीमधील जवळीक वाढताना दिसत आहे.

Review