त्यामुळे विधानसभा निवडणूक देखील सहजपणे जिंकू - सुधीर मुनगंटीवार
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी जे निर्णय घेतले, त्यावर जनतेने विश्वास प्रकट केला आहे. राज्य सरकारने देखील लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे विधानसभा निवडणूक देखील सहजपणे जिंकू, असा दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
अनेक काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यातील चांगल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काँग्रेस नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीची जी स्थिती १७ राज्यांमध्ये झाली आहे, ती स्थिती बघता काँग्रेस पक्ष हा उभा होऊच शकत नाही, असे चित्र असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.