संतोष गंगवार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
आठ वेळा खासदार राहिलेले संतोष गंगवार हे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष असतील. लोकसभेतील सर्व सदस्यांना शपथ देणे आणि त्यांचे स्वागत करणे आदी जबाबदारी हंगामी अध्यक्षांची असते.
17 व्या लोकसभेतील हंगामी अध्यक्ष म्हणून संतोष गंगराम यांची निवड करण्यात आली आहे. तब्बल आठ वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले गंगराम हे ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांच्याकडे हंगामी सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.