पंकजा मुंडे प्रदेशाध्यक्ष होणार का ?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दिल्लीला गेले तर महाराष्ट्रात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी महिला-बालविकास आणि ग्रामविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे या प्रदेशाध्यक्ष होतील असा राजकीय कयास मांडला जात आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष पदाची जागा रिक्त होणार आहे. त्यासाठी भाजपकडून प्रदेश अध्यक्ष पदासाठी राज्यातील अनेक नेत्यांचा विचार केला जात आहे.या शर्यतीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा समावेश आहे. पण एक महिला अध्यक्ष म्हणून आणि पट्टीच्या वक्त्या या नात्याने मुंडे यांचे पारडे जड आहे.
निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील पण यावरील राजकीय चर्चा मात्र सुरु झाल्या आहेत.