रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार - नितीन गडकरी

देशाचा जीडीपी वाढवणं आणि रोजगार निर्मिती करणं या साठी प्रयत्न करणार असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर नितीन गडकरी नागपुरात आले. यावेळी त्यांनी विजयानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. लघू उद्योग आणि रोजगार निर्मिती करणं हे माझ्यापुढचं लक्ष्य आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. अजून कोणतंही टार्गेट सेट केलेलं नाही. नवीन योजना आणायच्या आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. विविध भागात रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचं लक्ष्य आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. येत्या तीन वर्षात सगळ्या महामार्गांची कामं पूर्ण होतील असंही त्यांनी म्हटलं आहे. खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करणार आहे असेही गडकरी यांनी म्हटलं आहे. खादीची निर्यात, मधाची निर्यात वाढवणं हे सध्या लक्ष्य ठेवलं आहे असंही गडकरींनी स्पष्ट होतं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी नागपुरात आले आहेत. माझं काम जास्तीत जास्त करणार, मी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री आहे की नाही हे लोकांनी ठरवायचं आहे. मी स्वतः जेवढं काम करायचं तेवढं करत रहाणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Review