शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल उदयनराजे यांचे गौरवोद्गार...

बाबासाहेब पुरंदरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माेठंं कार्य असून त्यांच्यावर टीका करणं याेग्य नाही असं मत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले. पुण्यात कात्रज परिसरात हाेत असलेल्या शिवसृष्टीची पाहणी करण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. सध्या देशाला छत्रपती शिवाजी माहाराजांच्या विचारांची गरज आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात शिवसृष्टीचं काम सुरु आहे. या शिवसृष्टीला सरकार मदत करत आहे. पण सर्वांनी या शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज आहे असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Review