‘भारत’ने पहिल्याच दिवशी जमवला सुमारे ३५ कोटी रुपयांचा गल्ला...
ईदच्या मुहूर्तावर सलमान खान चा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अली अब्बास जफर यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
देशभरातील ४७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ने पहिल्याच दिवशी सुमारे ३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
याआधी प्रदर्शित झालेले ‘ट्युबलाइट’, ‘रेस ३’ हे सलमानचे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांच्या नजर होत्या.
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचे कडबोळे आहे.
सलमानचे फॅन आणि सिनेमा रसिक याला कसा प्रतिसाद देतात ते लवकरच कळेल पण सल्लूमियाँने मात्र त्याचे पैसे अगोदरच वसूल केले हे मात्र खरे.