रॅगिंग हे पुरोगामी महाराष्ट्राला कलंक - महाजन
पुरोगामी महाराष्ट्रात विद्यार्थिनींच्या बाबतीत रॅगिंगसारखे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. उच्चशिक्षण घेणाºया विद्यार्थिनीला रॅगिंगला कंटाळून आपले जीवन संपवावे लागले ही निषेधार्ह बाब आहे.रॅगिंगविरोधी कायद्यात आवश्यक त्या तरतुदी करून हा कायदा अधिकाधिक सक्षम करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
गिरीश महाजन यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पोलीस आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून, रॅगिंगविरोधी कायदा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. रगिंंगविरोधी कायदा अस्तित्वात आहे; मात्र तो कायदा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.