मोदी सरकारने ११ प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता
मोदी सरकारने ११ प्राप्तिकर अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत भ्रष्टाचार आणि व्यावसायिक गैरवर्तणूकीच्या विरोधात पाऊल उचलले आहे.
बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यात १९८५ च्या आयआरएस तुकडीचे अधिकारी अशोक अग्रवाल , अपील आयुक्त असलेले एस. के. श्रीवास्तव, होमी राजवंश, बी. बी. राजेंद्र प्रसाद, मुंबईत प्राप्तिकर आयुक्त (सीआयटी) असलेले अजोयकुमार सिंग, बी. आरुलप्पा (सीआयटी) हे वरिष्ठ अधिकारी, आलोककुमार मित्रा, चंदर सैन भारती, अंदासू रविंदर, विवेक बात्रा, स्वेताभ सुमन, अनेक न्यायिक छानण्यांत दोषी आढळल्यानंतरही हे अधिकारी सेवेत कायम होते. त्यांना आता सरकारने घरचा रस्ता दाखविला. या कारवाईसाठी सरकारने नियम ‘५६-ज’नुसार मिळालेल्या आपत्कालिन अधिकारांचा वापर केला आहे.