शारदा जाधव यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन - प्रवीण डोळस ) - विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापिका शारदा जाधव यांचा सेवापूर्ती सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी शै.संकुलातील कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे येथे सोमवार दिनांक ( २४ ) रोजी संपन्न झाला.
त्यांनी संस्थेची ३३ वर्ष प्रदीर्घ सेवा केली आहे.
या सोहळयाला माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्यासह प्रमुख पाहुणे डोंगरे साहेब (रयत शिक्षण संस्था सातारा) ,प्रमुख वक्ते डॉ.जाधव जे.जी, प्रमुख उपस्थिती शंकर पवार (सहाय्यक विभागीय अधिकारी पश्चिम विभाग औंधगांव ), डॉ.पांडुरंग गायकवाड (प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी ) पाटील यु. के.(प्राचार्य नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी ) उपस्थित होते .
मान्यवरांनी मुख्याध्यापिका शारदा जाधव यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अवसरी शाळेच्या माजी विद्यर्थिनीनी यांनीही शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक पडवळ एस. एस.(पर्यवेक्षिका) यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी दोरगे बाई यानी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार रांगणेकर ए. एन यानी मानले आणि सूत्र संचालन धामणे आर. ए. व साकोरे एम.डी.यांनी केले.