स्वावलंबी. शीलवान विद्यार्थी घडविणे हाच रयत शिक्षण संस्थेचा वसा आणि वारसा - तरुजा भोसले
पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन - प्रवीण डोळस ) रयत शिक्षण संस्थेचा ठसा यात उमटला आहे. रूढ प्रथा परंपरांना छेद देऊन विकास घडविणे काटकसरी, स्वावलंबी. शीलवान, उत्साही विद्यार्थी घडविणे रयतेचा वसा आहे. संतांचा प्रेमभाव रयतेच्या उद्दिष्टांमध्ये दिसतो. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. तरुजा भोसले यांनी केले आहे
” रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच “शाल्मली” या वार्षिक अंकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. तरुजा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पत्रकार आश्विनी सातव-डोके, मुद्रक संतोष तोरणमल,
वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या प्रा.
संजीवनी पाटील , ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक एकनाथ कळमळकर, प्रणव
भारत भोसले इ. उपस्थित होते.
भोसले म्हणाल्या की, “ आपण जे वाचतो ते मनात रुजतं आणि कृतीत उतरतं म्हणून वाचन श्रेष्ठ आहे. अनेक ग्रंथ आणि व्यक्तिमत्वाचे परिशीलन “शाल्मली” या अंकात केले आहे. रयत
शिक्षण संस्थेचा ठसा यात उमटला आहे. रूढ प्रथा परंपरांना छेद देऊन विकास
घडविणे काटकसरी, स्वावलंबी. शीलवान, उत्साही विद्यार्थी घडविणे रयतेचा वसा
आहे. संतांचा प्रेमभाव रयतेच्या उद्दिष्टांमध्ये दिसतो.”
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “महाविद्यालयीन जीवन मंतरलेल्या दिवसांसारखे
असते. यावेळी प्रत्येकजण कवि मनाचा असतो. त्यांच्या मनातील काव्याचे
विरेचण व्हावे म्हणून ‘शाल्मली नियतकालिक काढले जाते. विद्यार्थ्यांच्या
मनातला अंकुर या अंकातून डोकावताना दिसतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाच्या उपप्राचार्या प्रा. मृणालिनी
शेखर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. संजय मेस्त्री यांनी करून दिला.
‘शाल्मली’ अंकाची प्रक्रिया प्रा. शहाजी मोरे स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार डॉ.
कामायनी सुर्वे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा कदम यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन ‘शाल्मली’ च्या प्रमुख संपादक प्रा. सुषमा खोपकर यांनी
केले.