तिवरे धरण फुटले, अनेक बळी आणि बेपत्ता, कोण आहे याला जबाबदार,
सह्याद्री बुलेटिन - चिपळूण तालुक्यातील तिवरे धारण फुटले असून सहा जणांचे मृत्यू झाले असून २१ लोक बेपत्ता आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे. यात एक संपूर्ण वाडी वाहून गेली आहे.
काही काळापूर्वीच स्थानिक नागरिकांनी धरण गळती संबंधी तक्रार केली होती, यावर प्रशासनाने दुरुस्थी केली होती अशी माहिती समोर येतेय.
अनंत हरिभाऊ चव्हाण (63),अनिता अनंत चव्हाण (58),रणजित अनंत चव्हाण (15),ऋतुजा अनंत चव्हाण (25),दुर्वा रणजित चव्हाण (1.5),आत्माराम धोंडू चव्हाण (75),लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72),नंदाराम महादेव चव्हाण (65),पांडुरंग धोंडू चव्हाण (50),रवींद्र तुकाराम चव्हाण (50),रेश्मा रविंद्र चव्हाण (45),दशरथ रविंद्र चव्हाण (20),वैष्णवी रविंद्र चव्हाण (18),अनुसिया सीताराम चव्हाण (70)
चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75),बळीराम कृष्णा चव्हाण (55),शारदा बळीराम चव्हाण (48),संदेश विश्वास धाडवे (18),सुशील विश्वास धाडवे (48),रणजित काजवे (30),राकेश घाणेकर (30)
हे लोक बेपत्ता आहेत
धरणाची दुरुस्ती केली तर ते फ़ुटलेच कसे?
याचे ठेकेदार कोण होते?
यातही अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली होती का?
या धरणाची दुरुस्ती झाली कि हा केवळ पैसे कमावण्याचा फार्स होता?
दोषींवर प्रशासन काय कारवाही करणार?
असे अनेक प्रश आहेत याची उत्तरेही दिली जातील पण बळी गेलेल्यांना न्याय मिळेल का? हा सवाल अनुत्तरीतच राहतोय.