कर्मयोग्याच्या कार्याचा सन्मान व्हावा - अझीज शेख
रमाई घरकुल योजना तळागाळात पोहचविण्यासाठी सर्व हार उत्कर्ष चिंतन समाजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी.बी.शिंदे हे कार्य करत आहेत. निस्वार्थी आणि निस्पृहपणे हि जनसेवा सुरु आहे. अशा व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन शिंदे यांना रमाई आवास योजना समितीत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी आर. पी. आय. वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अझीज शेख यांनी केली आहे.
प्रा. बी.बी.शिंदे, सायराबानू शेख, रामभाऊ ओव्हाळ, बाबुराव वक्ते, नारायण म्हस्के, शैलाताई मांदळे, राजश्री मोहिते, शालन ओव्हाळ यांच्या जाहीर सत्कार समारंभात शेख बोलत होते.
पिंपरी चिंचवड परिसरातील गोरगरीब, दलित आणि गरजू लोकांच्यामधें सर्वहारा समाज कार्य करत आहे, याचे नेतृत्व शिंदे करतात. त्यांना वंचितांच्या हक्काची जाणीव आहे, ते ऊचाशिक्षित आणि जेष्ठ नागरिक आहेत, अशा प्रामाणिक, निस्वार्थी कर्मयोग्याचा उचित सन्मान करावा, यामुळे त्यांना रमाई आवास योजना समितीत घ्यावे असे शेख म्हणाले.
या वेळी सर्वहाराचे पदाधिकारी, आरपीआयचे कार्यकर्ते आणि महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.