सनशाईन सोसायटीचा आदर्श इतर सोसायट्यांनी घेऊन कचरा निर्मूलनासाठी हातभार लावावा - नगरसेवक नाना काटे यांचे प्रतिपादन
पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - सनशाईन सोसायटीने कचऱ्याचे नियोजन करून एक आदर्श निर्माण केला आहे तसा आदर्श इतर सोसायट्यांनी घेऊन कचरा समस्या निर्मूलनासाठी हातभार लावावा असे प्रतिपादन नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.
प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील सनशाईन गृहनिर्माण सहकारी संस्था या सोसायटीच्या दैनंदिन ओला कचरा विघटन व खत निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन शनिवार ( दि. ६ ) रोजी नगरसेवक विठल उर्फ नाना काटे व नगसेविका शितल काटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
सोसायटीच्या वतीने नाना काटे व शितल काटे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सोसायटीचे चेअरमन प्रवीण बालन, सेक्रेटरी काकासाहेब सानप. प्रवीण तिवारी, राजेश गायकवाड, डॉ. भास्करराव शेजवळ, पावन झोपे, . महेश सावंत, पवन मेडीपटला, वसंत सहारे, तृप्ती सावंत, भार्गवी मेडीपटला, आदी सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साधारण एक हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात कचर्याचे विघटन करून खत निर्मिती करण्यात येते. सनशाईन सोसायटीमध्ये एकूण १२५ बंगलो सदनिका आहेत. सोसायटीतील सर्व नागरिक या उपक्रमात योगदन देत आहेत याचे नगरसेवक नाना काटे व शितल काटे यांनी कौतुक केले व असे खत निर्मिती प्रकल्प परिसरातील सर्व सोसायट्यानी राबवावा असे आव्हान करण्यात आले,