पवारांनी कधी पाच जिल्ह्य़ातून निवडणूक लढविली आहे का? चंद्रकांत पाटील यांचा खोचक सवाल

पुणे ( सह्याद्री बुलेटिन ) - मी पाच जिल्ह्य़ाच्या पदवीधर मतदारसंघामध्ये लढतो. शरद पवारांनी कधी पाच जिल्ह्य़ातून निवडणूक लढविली आहे का, असा खोचक सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पुणे येथे झालेल्या भाजप मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपमध्ये येण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे विरोधक धास्तावले आहेत. मात्र जे घेतो ते तावून सुलाखूनच घेतो. राज्याच्या मंत्रिमंडळात पाच वर्षांनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना घेण्यात आले. विखे यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. भुजबळांना पक्षात घेण्यात आले नाही. भाजपच्या संस्कृतीशी जुळतील, अशाच नेत्यांना पक्षप्रवेश दिला जात आहे. असेही पाटील म्हणाले.

 

Review