बंदी असलेल्या प्लस्टिक बॅगवर 'ग' क्षेत्रीय विभागाच्या वतीने जप्तीची कारवाई

पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - काळेवाडी फाटा येथे बंदी असलेल्या सुमारे ३५ किलो प्लास्टिकच्या गार्बेज बॅग जप्त करण्यात आल्या. ग क्षेत्रीय विभागाच्या वतीने हि कारवाई कऱण्यात आली.

बुधवार दि २४/०७/२०१९ रोजी दुपारी १ वाजता काळेवाडी फाटा येते सिग्नल वर फेरीवाल्या मुलीकडून बंदी असलेले ३५ की गारबेज बेग्ज प्लास्टिक जप्त करण्यात आले, ही कारवाई ग क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आरोग्य निरीक्षक संजय कुलकर्णी तसेच आरोग्य निरीक्षक शेखर निबाळकर, सदाशिव पुजारी,व कर्मचारी सुरेखा भागवत , धनेश्वर थोरवे, जयेश माकर, अशोक कांबळे, स्वदेश साळुंखे , प्रशांत पवार यांच्या उपस्थित करण्यात आली.

प्लास्टिक हे पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला धोकादायक आहे यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातली आहे, पण पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी अशा प्लॅस्टिकची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती ग क्षेत्रीय विभागाला मिळाली आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनी हि कारवाई केली

 

Review