आमदारांच्या मार्गदर्शनाने वाकडच्या विकासकामांना वेग - ममताताई गायकवाड

वाकड ( सह्याद्री बुलेटिन ) -  "वाकड-पिंपळे निलख परिसरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने व पूर्वीपेक्षा अधिक व उत्तम विकासकामे करण्याचा हेतूने आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी व चालू वर्षात स्थायी समितीमार्फत अनेक विकासकामे या प्रभागात करण्याच्या दृष्टीने आम्ही  काम करीत आहोत, गतकाळात आम्ही ठरवलेल्या कामांची अंमलबजावणी आम्ही करीत आहोत व यातील बरीच कामे येथील नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. स्मार्ट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने वाकड-पिंपळे निलखच्या विकासात भर घालणारी विकासकामे हि नक्कीच  या परिसरातील लोकांचा मान वाढवतील" असे प्रतिपादन स्थायी समितीच्या माजी सभापती व नगरसेविका ममताताई गायकवाड यांनी केले आहे. 
वाकड परिसरातील लिनिअर गार्डन, फुटबॉल टर्फ ग्राऊंड, तालीम व व्यायामशाळा या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या उपस्तितीथ पार पडला त्यावेळी गायकवाड बोलत होत्या.

नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने व महत्वकांक्षी विकासकामे होण्याकरिता स्थायी समितीच्या माजी सभापती व नगरसेविका ममताताई गायकवाड आणि मा.नगरसेवक विनायक गायकवाड यांनी या भागात स्मार्ट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सतत पाठपुरावा व प्रयत्न केले होते. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, संकेत चोंधे आणि परिसरातील यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पांडकर, पाटील, बशीर आबा, गायकवाड, मुकेकर, भालेकर, शेलार, कोळेकर,पवन भोसले, रमेश दिवेकर, ओव्हाळ इ. व  महिला उपस्तिथ होत्या

Review