रविश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर...
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
रवीश कुमार यांच्याबरोबर म्यानमारमधील पत्रकार को स्वी वीन, थायलंडच्या अंगखाना नेलापाजीत, फिलिपिन्सच्या रेम्युंडो पुतांजे सायाबयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जाँग की यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्कारासाठी निवड करताना निवड समितीने रविश कुमार त्यांच्या गुणांचा गौरव केला आहे. सत्तेला शांतपणे प्रश्न विचारत पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा सत्कार आहे’असे मॅगसेसेने म्हटले आहे.