पाणीच पाणी चहूकडे, राज्यात ओला दुष्काळ

राज्यातील अनेक पूल, बंधारे पाण्याखाली गेलेत, जास्ती पावसाने धरणांचे दरवाजे उघडल्याने नद्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी गावात, घरात, रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हि परिस्थिती महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी झाली आहे, यामुळे राज्यात ओला दुष्काळ सदृश स्तिथी झाली आहे. 
मराठवाडा आणि विदर्भ वगळता उर्वरित राज्यात वरुणराजाने पावसाची पूर्ण कसर भरून काढली आहे. उत्तर महाराष्ट्र कोकण, मध्य महाराष्ट्रात आणखी चार दिवस जोरदार पाऊस राहणार आहे.


पुणे हवामान विभागातर्फे सांगण्यात येत आहे की, कोकणात सोमवारी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून पुढील चार दिवस अनेक ठिकाणी पाऊस राहील़ मराठवाड्यात सोमवारी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात सोमवारी सर्वदूर हलका पाऊस होईल़

महाराष्ट्रात पुढील काही तास तरी हीच स्थिती राहणार आहे यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन शासकीय स्थरावरुन करण्यात येत आहे. 

Review